शेतकऱ्याने घेतली जॅग्वार कार, वाटले सोन्याचे पेढे!

शेतकऱ्याने घेतली जॅग्वार कार, वाटले सोन्याचे पेढे!

 

इतिहासात आत्तापर्यंत आपण आनंद साजरा करताना राजा महाराजांनी हत्तीवरून साखर वाटल्याच्या गोष्टी ऐकल्या असतील. पण कार घेतल्याच्या आनंदात बळीराजाने सोन्याचे पेढे वाटल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. सुरेश पोकळे या शेतकऱ्याने स्वकष्टाच्या कमाईतून जवळपास  1 कोटी 12 लाख रुपये किंमतीची ‘जॅग्वार एक्सएल’ ही महागडी कार खरेदी केली. या कारसाठी सुरेश पोकळे यांनी मोठा खर्च केला आहे. आता एवढी महागडी कार खरेदी केल्यावर त्याचा आनंदही तितक्याच शाही थाटात साजरा करायला नको का? तर कार खरेदी केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पोकळे यांनी खास तीन किलो स्वर्णजडित पेढे बनवून आपल्या आप्तेष्टांमध्ये वाटले.

सोन्याचा वर्ख असणारे 1 किलो पेढे बनवण्यासाठी जवळपास 7 हजार रुपये खर्च आला आहे. असे 3 किलो पेढे सुरेश पोकळे यांनी पुण्यातील ‘काका  हलवाई’ या दुकानातून खास बनवून घेतले आहेत.

अशा  प्रकारचे  पेढे  यापूर्वी  कुणीही  तयार  केले नव्हते. हे पेढे केवळ दिसायलाच तेजस्वी नसून आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहेत, असं ‘काका हलवाई’चे  मालक अविनाश गावडे यांनी म्हटलं आहे.

कर्जबजारीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. मात्र अशा प्रकारे आलिशान गाड्या विकत घेऊन त्यासाठी आनंदाने सोन्याचे पेढे वाटणं जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील.  

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version