सीडीआरप्रकरणी 13 अटकेत, तपासात महत्त्वाची बातमी समोर

सीडीआरप्रकरणी 13 अटकेत, तपासात महत्त्वाची बातमी समोर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सीडीआरप्रकरणी तब्बल 9 खासगी गुप्तहेरांसह 13 आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण पथकानं अटक केलीय. दोन सीडीआर काढल्याप्रकरणी गुरुवारी अटक केलेल्या गुप्तहेर जिग्नेश छेडाला न्यायालयानं 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

यापूर्वी भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह आठ गुप्तहेर, सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुझ्झीन सिद्धीकी यांचे वकील रिजवान सिद्धिकी, एक मोबाईल कंपनीचा कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी आणि सायबर तज्ज्ञांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणातील सहा आरोपींना जामीन मंजूर झालाय. तर छेडा यांच्या तपासात आणखी महत्वाची माहिती हाती लागली असून त्यावर तपास सुरू असल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version