‘कुल यांच्या कारखान्याची सीबीआय चौकशी करा’

‘कुल यांच्या कारखान्याची सीबीआय चौकशी करा’

उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात राऊतांनी सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच, या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे.

संजय राऊतांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतानाही भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत. माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे आहेत. त्यापैकी राहुल कुल यांचा एक कारखाना आहे. संजय राऊतांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतानाही भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. तसेच, यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीबीआयकडे तक्रार दाखल केली असे राऊत म्हणाले.

सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी अनेक आरोप केले आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झालाच्या आरोप संजय राऊतांनी केला आहे. कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही संजय राऊतांनी सीबीआयकडे केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version