निलेश राणेंसह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

निलेश राणेंसह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेर अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळाली. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी रात्री ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणे न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे याप्रकरणी ओरोस पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेमुळे पोलीस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, ५ किंवा त्यापेक्षाही जास्त जमाव केल्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणेसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भादवी कलम १८८ व २६८, २७० पोलिसाशी हुज्जत घालणे १८६ अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version