मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘मै भी देवेंद्र फडणवीस’!

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘मै भी देवेंद्र फडणवीस’!

नागपुरातील दक्षिण – पश्चिम मतदारसंघ ही BJP साठी प्रतिष्ठेची आहे. कारण याच मतदारसंघातून जिंकून आलेले आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. यापूर्वी दोन वेळ याच मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय मिळविलाय.

आता विजयाची हॅटट्रिक करताना किमान 1 लाखाच्या मतफरकाने फडणवीसांना निवडून आणण्याचं लक्ष्य BJP ने निर्धारीत केलंय.

‘मै भी देवेंद्र फडणवीस’ हे ब्रीदवाक्य घेऊन BJP प्रचारयंत्रणा राबवणार आहे.

भाजपच्या मतदारांसोबतच वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांच्या चाहत्यांना आकर्षित करण्याचा त्यांचा मानस आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याची धुरा असल्याने उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर याच मतदारसंघात फडणवीस यांच्या फक्त दोन सभा होणार आहेत.

राहुल गांधी जरी उभे राहिले, तरी…

कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते संदीप जोशी यांनी सांगितलंय.

“काँग्रेसने सरप्राईज उमेदवार देण्याऐवजी सरळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील उमेदवारी दिली तरी विजय फडणवीस यांचाच होणार असल्याचा विश्वास भाजपला आहे,” असं जोशी यांनी आवर्जून सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version