मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्तारबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आषाढी एकादशीची पूजा झाल्यानंतर खातेवाटप करणार आहे. याबाबत लवकरच सांगण्यात येईल. मात्र अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
१८ जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. मुंबईत भेटून चर्चा करू आणि लवकरच या प्रश्नाचं उत्तर देऊ असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. भाजप सेना युतीचं जे सरकार अडीत वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं ते आता आम्ही केलं आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. 5 वर्ष ज्यांनी खूप चांगलं काम केलं. शेतकरी आणि लोकहिताचं काम केलं ते मधल्या काळात खंडीत झालं आहे. ते आम्ही पुन्हा पुढे नेणार आहोत असंही मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.