पंतप्रधान मोदींच्या नवरत्नांची नवी टीम

पंतप्रधान मोदींच्या नवरत्नांची नवी टीम

जय महाराष्ट्र न्यूज,  नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर 3

जुन्या चेहऱ्यांना बढती दिली जाईल. मोदींच्या या नव्या मंत्र्यांनी रविवारी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

मोदींच्या या नव्या टीममध्ये 2 आयएएस, 1 आयपीएस तर एक आयएफएस अशा निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

 

मोदींच्या या नवरत्न टीममध्ये महाराष्ट्राला मात्र स्थान मिळालेलं नाही. बिहार आणि उत्तरप्रदेशचे प्रत्येकी दोन, तर, राजस्थान, केरळ आणि कर्नाटकमधून प्रत्येकी एका

मंत्र्याला संधी देण्यात आली आहे.

 

शिवप्रताप शुक्ला, अश्विनीकुमार चौबे, वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, आर.के.सिंह, अल्फान्सो कन्नथनम, हरदीप सिंग पुरी, सत्यपाल सिंह, गजेंद्रसिंह शेखावत

अशी मोदींच्या मंत्रिमंडळातील 9 रत्नांची नावं आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version