अक्षय्य तृतीयानिमित्त सोने खरेदी

अक्षय्य तृतीयानिमित्त सोने खरेदी

साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयांच्या मुहूर्तावर जळगावात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी बऱ्याच नव्या गोष्टींना सुरूवात होते. नवे कपडे, गोडधोडाचा जेवण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नवी सोनं खरेदी करतो. जगभरात लोकांना सोन्याच भारी आकर्षण आहे. पण, भारतातील लोकांना सोन म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, कारण घरात रात एकतरी सोन्याचा तुकडा असणारी अनेक घरे आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या दिवशी केलेली सोने खरेदी ही अक्षय देणारी शुभ मानली जात असून थोड का होइना सोने खरेदी केली जाते व हा मुहूर्त ग्राहक साधत असतात मागील वर्षाच्या तुलनेत सोने हे जवळपास दहा हजार रुपयांनी वाढले असून आज सोन्याचे भाव जीएसटी सह ६२०००० रुपये इक्ते असून दिवसे दिवस मोठी भाववाढ सोन्यामध्ये होताना दिसत आहे अमेरिकन बँकांचे धोरणाच्या परिणामामुळे सोन्याचे भाव वाढ झाल्यामुळे भविष्यात नागरिकांचा पण गुंतवणूक या दृष्टीने सोन्याकडे वळला आहे आजचे खरेदी केले सोने भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते यानिमित्त नागरिक थोडं का होईना सोन हे खरेदी करत असतात जळगावच्या बाजारात आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version