मुंबई: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली आहे. कल्याण तालुक्यातील हेदुटणे गावामध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बैलगाडा मालक एकत्र होऊन या सर्व बैलगाडा मालकांनी दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच, या बैलगाडा मालकांनी दहशतवाद्यांना आश्रय देणार्या पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या बैलगाडा मालकांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली. त्यासोबतच, या बैलगाडा मालकांनी आपल्या जनावरांना मैदानात आणत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
हेही वाचा: पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात
अनोख्या पद्धतीने देण्यात आली श्रद्धांजली
मंगळवारी, दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बैलगाडा मालकांनी चक्क जनावरांवर पेंटिंग केली. यादरम्यान, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत बैलगाडा मालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यासोबतच, केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी बैलगाडा मालकांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.