जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकरी संपाची झळ संपाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेलाही बसली आहे. सध्या राज्यात शिवसेनेचं ‘मी कर्जमुक्त होणार’ हे अभियान राबवलं जात आहे.
या अभियानांतर्गत शिवसेना खासदार अरविंद सावंत बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता. काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
त्यांनी थेट मोदी आणि उद्धव ठाकरेंवरुन अरविंद सावंतांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि खडेबोलही सुनवले.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अरविंद सावंतांसह बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधवांची बोलतीच बंद झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.