लग्न लावून घरी परतताना वऱ्हाडीचा अपघात, नवरदेवाचा जागीच मृत्यू

लग्न लावून घरी परतताना वऱ्हाडीचा अपघात, नवरदेवाचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

नांदुरा तालुक्यातील खैरा येथील श्यामराव कावणे यांच्या मंगेश (25) नामक मुलाचा बुधवारी कुरणगाड येथील गजानन भाकरे यांच्या योगिता नामक मुलशी बुधवारी विवाह पार पडला. विवाह सोहळ्यानंतर व-हाडी नवरदेव -नवरीला घेवून एमएच 14 बीसी 4480 या वाहनाने खैरा येथे परतत होते.

त्याचवेळी खांडवी येथून झाडेगाव रस्त्यावर समोरून येणा-या एमएच 28 एच 9685 या मालवाहू वाहनाने नवरदेव-नवरीच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चालकाच्या पाठीमागे बसलेला नवरदेव चालू वाहनातून सुमारे दीडशे फूट अंतरावर फेकला गेला.

या दुर्घटनेत जबर मार लागल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. तर या वाहनातील नवरी आणि इतर सहा ते सात नातेवाईक गंभीर जखमी झाले. जखमी असलेल्या नवरीला नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version