जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाण्यात धक्कादायक घटना घडलीय. बौद्ध विहारातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केलीय. यावेळी 60 हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील धम्मगिरी बौद्ध विहारातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. यावेळी 60 हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले असून या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.