चार लाख भाविकांची महापंगत; 200 ट्रॅक्टरने वाढला प्रसाद

चार लाख भाविकांची महापंगत; 200 ट्रॅक्टरने वाढला प्रसाद

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाणा जिल्ह्यातील हिवराश्रम येथील विवेकानंद आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त दरवर्षी महापंगतीचे आयोजन केलं जातं. यावर्षीही 4 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

पंगतीत चक्क 200 ट्रॅक्टरने प्रसाद वाढला गेला तर तब्बल 200 क्विंटल पुऱ्या आणि वांग्याची भाजी बनवण्यात आली.

दरवर्षी 3000 हून अधिक सेवक या ठिकाणी निःस्वार्थ भावनेने या दिवशी सेवा देतात. गेल्या 51 वर्षापासून स्वामी विवेकानंद यांचा जन्मोस्तव साजरा केला जातो.

हा उत्सव पाहण्यासाठी व येथील उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक येत असतात.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version