जय महाराष्ट्र वेब न्यूज, बुलढाणा
बुलढाण्यातील एका कुटुंबाला नदीपात्राजवळ उभे राहून सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे.
नदीपात्राजवळ सेल्फी काढत असताना या कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुलडाण्यामधील खिरोडीत पूर्णा नदीजवळ सेल्फी काढताना राजेश चव्हाण त्यांच्या कुटुंबीयांसह पूर्णा नदीपात्रात वाहून गेले होते.
एनडीआरएफचे जवान पूर्णा नदीपात्रात उतरुन मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर करत होते.
राजेश चव्हाण, त्यांची पत्नी आणि 10 वर्षांचा मुलगा सेल्फी काढण्यासाठी नदी जवळ गेले असताना तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. राजेश चव्हाण हे जळगाव जामोद इथल्या बुलढाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत होते.
बुलडाण्यात पूर्णा नदीमध्ये बुडालेल्या चव्हाण कुटुंबीयांपैकी राजेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला आहे.
राजेश चव्हाण यांचा मृतदेह कथुराजवळ सापडला तर त्यांच्या पत्नीचा मृतदेह भास्तनजवळ सापडला आहे. मात्र मुलाच्या मृतदेहाचा शोध अजुनही एनडीआरएफच्या जवानांकडून सुरु आहे.
सेल्फीच्या नादात गमावले प्राण
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.