जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापुरात पाडव्यानिमित्त आज म्हैशींची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत म्हैशींना खास सजवून त्यांची शर्यत घेण्यात आली. यासाठी म्हैशींना विविध रंगाचे गोंडे, माळा वापरून सजविण्यात आलं होतं. झकास मेकअप करुन या म्हैशी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. म्हैशीची एका पेक्षा एक सजावट करण्यात आली होती. तर, म्हैशींच्या शर्यतीत मालकाच्या मोटारसायकलमागे धावण्याची अटही या म्हैशींनी अवघ्या काही सेकंदात पूर्ण केली. ही स्पर्धा बघण्यासाठी कोल्हापूरात आसपासच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.