जगभरात दूध उत्पादन क्षेत्रात अमेरिका सर्वात पुढे मानले जाते तर भारतात सर्वाधिक जनावरांची संख्या असूनही दूध उत्पादन क्षेत्रात भारत मागेच आहे.
मात्र यावर मात करण्याच्या उद्देशाने सांगलीच्या चितळे समूहाच्या जीनस व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एबीएस संस्थेच्या वतीने भिलवडी येथे भारतातील दूध उत्पादन क्षेत्राला नवी दिशा देणारा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.
जनुकीय तंत्राच्या आधारे केवळ स्त्री-बीजांच्या वापरातून कृत्रिम रेतन करत जगातील पहिल्या म्हशीचा भिलवडीतील चितळेंच्या ‘ब्रह्मा’ या प्रकल्पात जन्म झाला आहे.
या प्रयोगातून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या म्हशीचे ‘दुर्गा’ असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रयोगातून जन्म झालेल्या म्हशीचे वजन 32 किलो आहे.
या प्रयोगासाठी निवडलेली मुऱ्हा जातीची म्हैस ही अधिक स्निग्धांशाचे दूध देणारी आहे, म्हणून तिची निवड करण्यात आली आहे, या प्रकारच्या कृत्रिम रेतनातून आपण चांगल्या गाई-म्हशींची निर्मिती करू शकू असंही चितळेंनी म्हंटल आहे.
काय आहे हा प्रकल्प?
हा प्रयोग भारतातीलच नव्हे तर हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा चितळे बंधूनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.