‘भारताला आत्मनिर्भर बनविणारा अर्थसंकल्प’ – देवेंद्र फडणवीस

‘भारताला आत्मनिर्भर बनविणारा अर्थसंकल्प’ – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाही बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी खूप खूप आभार मानतो.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले की, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही योजना देशात रोजगार निर्मिती करत आहेत, अशा शब्दात चंद्रकात पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

‘अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत’ – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प २०२२वर प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प युवा, शेतकरी, कामगारांसाठी फायदेशीर असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या अर्थसंकल्पामुले तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. तर या अर्थसंकल्पाचा विशेष कल हा गरिबांचे कल्याण करण्याकडे आहे. गरिब, गरजूंच्या अनेक सुखसोयींवर या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version