शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार; शेत मालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा

शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार; शेत मालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

शेतकऱ्याच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा जेटली यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्याला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील तिसरा टप्प्याची अंमलबजावणी करणार, असल्याची माहिती जेटली यांनी यावेळी दिली.

शेतमालाचे मार्केटिंग करण्याची गरज असून यासाठी कृषी आणि वाणिज्य मंत्रालय संयुक्तपणे प्रयत्न करतील. तसेच  शेतकऱ्यांना उत्पादन मुल्याच्या दीडपट हमीभाव देण्यात येईल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असे जेटली यांनी स्पष्ट केले. त्यासाठी शेतकरी, गरीब वर्गांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, असे ते म्हणालेत.

सुगंधी वनस्पती उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देणार येणार आहे. नॅशनल बांबू मिशनसाठी १२९० कोटी रूपयांची तरतूद करुण्यात आली असून बांबू हे ग्रीन गोल्ड आहे, असे अरुण जेटली म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version