वकील सतीश उकेंना मुंबईत आणलं; उकेंचा भाऊही ताब्यात

वकील सतीश उकेंना मुंबईत आणलं; उकेंचा भाऊही ताब्यात

जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने वकील सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने चौकशीसाठी सतीश उके यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक वकील उकेंना घेऊन मुंबईला पोहचले आहे. वकील उके यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके यांनाही मुंबईत आणण्यात आले आहे.

नागरपूरच्या ईडी कार्यालयात वकील सतीश उके आणि त्याचे मोठे भाऊ प्रदीप उके यांची पाच तास चौकशी झाल्यानंतर ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईत आले आहे. त्यामुळे त्यांची पुढील चौकशी मुंबईच्या ईडी कार्यालयात होणार आहे. मात्र, त्याआधी सतीश आणि प्रदीप उके यांना मुंबईच्या न्यायालयात हजर करावे लागणा आहे. तर ईडीकडून दोघांची कोठडी मागण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ईडीची कारवाई होत असल्याचा आरोप वकील सतीश उके यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीसांनी २०१४मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. याविरोधात सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version