बृजभूषण शरण सिंह अडचणीत

बृजभूषण शरण सिंह अडचणीत

बृजभूषण सिंह हे नॅशनल कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला बसले आहेत. बृजभूषण सिंह हे हुकूमशाही करतात, त्यांनी महिला कुस्तीपटूंचे शारीरिक शोषण केले आहे, असे आरोप या कुस्तीपटूंनी केले आहेत.

बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शौषण केलं आहे. तसेच डब्ल्यूएफआयच्या अधिकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने केला आहे. मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितंल आहे. आता मला माहित नाही की तो (बृजभूषण) मला जगू देईल की नाही. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी येत आहे’, असं विनेश फोगाटने म्हटलं आहे. बजरंग पुनियानं जोपर्यंत भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन बृजभूषण शरण सिंह यांना हटवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं म्हटलं.

बृजभूषण शरण सिंह काय म्हणाले?

कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आरोपात सत्य नसल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेण्यासही तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. कुस्ती संघाचं अध्यक्षपद सोडणार नसून सीबीआय किंवा पोलीस चौकशीला तयार असल्याचं सिंह म्हणाले. या आरोपामागं उद्योजक असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. तर, विनेश फोगटला धमकी मिळाली त्यावेळी ती पोलिसांकडे का गेली नाही, असा सवाल सिंह यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version