‘भाकरी फिरवावी लागणार’

‘भाकरी फिरवावी लागणार’

अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागेल, अशा कानपिचक्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरातून पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, अजित पवारांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. नंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला असला तरी नेतृत्वात बदल करणार असल्याचे सांगितले होतं. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला आहे.

अजित पवार यांनी मेळाव्यात बोलताना भाकरी फिरवावी लागणार आहे आणि भाकरी फिरवली जाणार असल्याचे सुतोवाच केले. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व तयार करण्याचा आता आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये काम करायला लावले. मी सांगितले तसे काम केले आणि काँग्रेसकडे असणार मतदारसंघ आपल्याकडे आला. कुठल्याच मतदार संघात कोणाची मक्तेदारी नसते.

राधानगरीत ए.वाय आणि के.पीचं मिटत नाही तोपर्यंत आबिटकरच फावणार आहे. राजकारण हवेवर करून चालत नाही. कोणतीच लाट फार काळ टिकून राहत नाही. तुम्ही पक्षाची ताकत वाढवा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना जागा कशा वाढवून द्यायच्या ते मी बघतो. त्यात मी वस्ताद आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज्य ढवळून काढायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version