हरवलेला मुलगा व्हॉट्स अॅपवर सापडला

हरवलेला मुलगा व्हॉट्स अॅपवर सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

एरवी व्हॉट्स अॅपवर चॅटिंग करून आपला वेळ वाया घालवला जातो म्हणून ओरड ऐकू येत असते. मात्र, वडगाव मावळ येथे आई आणि घरापासून हरवलेला दोन वर्षाचा चिमुकला व्हॉटस अॅप व पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन तासात आईच्या कुशीत विसावला.

जगदीश अलीम शेख वय 2 वर्षे असे या मुलाचे नाव आहे. जगदीश हा सकाळी आई कामासाठी बाहेर निघाली असता तिच्या नकळत घरातून तिच्या पाठीमागे चालत आला. हा मुलगा चालत-चालत वडगाव मावळच्या पोटोबा मंदीराजवळील गजबजलेल्या परिसरात आला असता आई दिसेनाशी होताच त्याने रडायला सुरुवात केली.

यावेळी तेथील नागरिकांनी त्याला जवळ असलेल्या पोलीस चौकीमध्ये आणले. यावेळी पोलिसांनी व्हॉटस अॅपचा आधार घेतला. काही क्षणात त्यांनी त्या मुलाचे फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल केले. हाच फोटो फिरत फिरत आई काम करत असलेल्या ठिकाणी तिच्या सहका-याकडे गेला. तिथे तिला आपला जगदीश हरवले असल्याचे कळाले व तातडीने तिने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version