वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा दणदणीत परावभव केला. या विजयासोबतच विजेंदरने चीनला सीमेवर शांततेचा
संदेशही दिला.
या विजयामुळे विजेंदरने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. विजेंदरने डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा खिताब राखून ठेवला. या सोबतच डब्ल्यूबीओ
ओरिएंटल सुपर मिडलवेट टाइटलचा किताबही जिंकला.
मायमायतीवरील विजयानंतर विजेंदरने खिताब घेण्यास नकार दिला. ‘हा किताब मायमायतीला देण्याची आपली इच्छा आहे. किमान यामुळे तरी सीमेवर शांतता ठेवण्याचा
संदेश चीनला जाईल’, असे विजेंदर म्हणाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.