…म्हणून ‘त्या’ तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बाटली फेकली

…म्हणून ‘त्या’ तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बाटली फेकली

 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी अहमदनगरच्या राळेंगण सिद्धीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा भूमीपूजनाचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम सुरु असतांना एका मुकबधिर तरुणाने मुख्यमंत्र्याच्या दिशेने बाटली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशांत महादेव कानडे असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच क्षणी त्या तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, या तरुणाने 6 जानेवारी 2016 मध्ये बॅंकींग क्षेत्रात नोकरी मिळणेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्याबाबत काहीच दाद न मिळाल्याने या तरुणाने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version