जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
स्ट्रॉबेरी तसंच थंड हवेचं ठिकाण ही महाबळेश्वरची ओळख. पण स्ट्रॉबेरीचं गाव आता पुस्तकांचं गाव म्हणूनही ओळखलं जाणार आहे.
महाबळेश्वरच्या भिलार गावानं पुस्तकाचं गाव ही नवीन ओळख तयार केली. पुस्तकाच्या गावाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
विनोद तावडेंचा हा महत्वांकाक्षी प्रकल्प आहे. या पुस्तकांच्या गावामध्ये पंचवीस घरांत आणि सार्वजनिक जागांत पुस्तकांचा वाचनानंद घेता येणार आहे.
या पुस्तकांवर अनुक्रमांक टाकून पुस्तक शोधण्याची अद्ययावत व्यवस्था याठिकाणी करण्यात आली. तसेच कुठल्या घरात कोणते पुस्तक आहे, याचे निदर्शक फलक रस्त्यावर लावण्यात
आलेले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.