वर्षोनुवर्षे रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे आणि महामार्गावरील खड्डे तत्काळ भरावे, या मागणीसाठी वाकण नाक्यावर बुधवारी ९ ऑगस्ट बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.याबाबत अनेक संघटना, सामाजिक संस्थांनी आवाज उठवला आहे, मात्र तरीही महामार्ग खड्डेमुक्त करण्यात अपयश आले आहे. सरकार तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याकरिता तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला वेग यावा, यासाठी कोकणातील पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे यांना जवळपास दहा हजार एसएमएस पाठवले जाणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.