न्यूयॉर्कमधील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात टपालाद्वारे स्फोटकं पाठवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी विदेश मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्यानंतर न्यूयॉर्कमधील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात पाठवणारे स्फोटक एकच व्यक्ती किंवा संघटना असावी, अशी शक्यता अमेरिकन गुप्तचर एजन्सीने व्यक्त केली आहे.
‘अमेरिकेतील नागरिकांची सुरक्षा ही माझ्यावरील सर्वोच्च जबाबदारी आहे. मी एफबीआय, गुप्तचर विभाग आणि अन्य यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अशा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही, हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटरवर सांगितले.
The safety of the American People is my highest priority. I have just concluded a briefing with the FBI, Department of Justice, Department of Homeland Security, and the U.S. Secret Service… pic.twitter.com/nEUBcq4NOh — Donald J. Trump (@realDonaldTrump) October 24, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.