जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन कोणतेही काम हाती घेतले की, त्यात स्वत:चा जीव ओतून टाकतात. बिग बी आपल्या बऱ्याच गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असतात. बिग बीं नी पहाटे 4 वाजेपर्यंत एक गाणं रेकॉर्ड केल्याचे म्हटलयं.
याबाबतचे किस्से बिग बीं नी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकतेंच बिग बी एका लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते. तिथून ते रात्री उशिरा स्वत:च्या आवाजातलं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी म्युझिक स्टुडिओत गेले. आणि तिथे पहाटे 4 वाजेपर्यंत ते गाणं रेकॉर्ड करत होते. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान हे गाणं काय आहे, कोणासाठी आहे याचा त्यांनी काहीच उल्लेख केलेला नाही. पण त्यांनी गातानाचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स ट्विट केले आहेत. तसेच,‘ पूर्ण गाणं एकाच आवाजात शूट झालं, ते बरं झालं.‘ असेदेखील त्यांनी लिहिलंय,
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.