आता रेल्वे कर्मचाऱ्यांची अशी होणार हजेरी

आता रेल्वे कर्मचाऱ्यांची अशी होणार हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जानेवारीपासून देशभरातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाकडून याची जोरदार तयारी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा विचार सुरु होता. या प्रणालीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक ओळखपत्र दिलं जाईल. ज्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती असेल.

बायोमेट्रिक मशीनसमोर कर्मचाऱ्यांनी आपलं कार्ड धरलं किंवा स्वाईप केलं तर त्याची उपस्थिती नोंद केली जाईल. तर काही मशीनसाठी कर्मचाऱ्यांना त्यांना आपलं थम्ब इम्प्रेशनही द्यावं लागेल. या हजेरीच्या आधारेच कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दिला जाईल. सध्या ही व्यवस्था रेल्वेमधील रेल्वे बोर्ड, विभागीय मुख्यालये आणि काही मोजक्या कार्यालयात सुरु आहे. पण आता रेल्वेच्या सर्व विभागात ही प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version