जातीचे बनावट दाखले बनवणारा ठग अटकेत

जातीचे बनावट दाखले बनवणारा ठग अटकेत

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात जातीचे बनावट दाखले करुन देणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिद्धार्थ झिने असं या ठगाचं नाव आहे. मुलीला महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला बनवून देतो असं सांगून आरोपीने सुशीला गवईंकडून पैसे उकळले.

 

मात्र, आरोपीने दिलेला जातीचा दाखला बनवाट असल्याचा संशय सुशीलाबाईंना आल्यावर त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर तहसीलदारांनी या ठगाला पोलिसांच्या हवाली केलं.

बुलडाणा परिसरात अशा भामट्यांची टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा लोकांपासून सावधन राहण्याचं आवाहन पोलिसांनी जनतेला केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version