जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता नववीच्या पुस्तकात राजीव गांधींचा उल्लेख आहे. बोफर्स प्रकरणामुळे राजीव गांधींचा पराभव झाला असं पुस्तकात छापण्यात
आले.
त्यामुळे नागपूर काँग्रेसनं यावर आक्षेप घेत कडाडून विरोध केला. इतिहासाच्या पुस्तक निवड समितीत मोठमोठे विद्वान असूनही अशी चूक होतेच कशी असा सवाल
काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
तर, सरकार अभ्यासाच्या माध्यमातून काँग्रेस विषयी द्वेष पसरवत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस कडून करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.