जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला आहे. यावर तोडगा म्हणून बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टला महापालिकेनी मदत म्हणून 2 हजार कोटी रक्कम उपक्रमाला द्यावी असं शिवसेनेनं प्रस्तावित केलं. याला पालिका आयुक्तांनाही तत्वत: मान्यता दिली आहे.
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढताना बेस्ट समितीचे अधिकार मात्र अबाधित ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनासह लोकप्रतिनिधींनी अनेक बैठका घेऊनही हा प्रश्न सुटलेला नव्हता.
त्यामुळे उद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने या विषयावर आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजॉय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.