यंदा मुंबई तुंबणार नाही- पालिका प्रशासनाचा दावा

यंदा मुंबई तुंबणार नाही- पालिका प्रशासनाचा दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेतील ‘पारदर्शकते’चे पहारेकरी आणि विरोधी पक्ष काँग्रेस सातत्याने नालेसफाई होत नसल्यावरून पालिका प्रशासनावर टीका करत आहेत. मात्र पालिका प्रशासनाने मुंबईमधील नालेसफाईची 94 टक्के कामे 31 मार्च रोजी पूर्ण केल्याचा दावा केला.

 

इतकेच नव्हे तर प्रशासनाने पूर्व उपनगरांमध्ये 100 टक्के तर पश्चिम उपनगरात 91 नालेसफाई झाल्याचा दावा केला. प्रशासनाने जाहीर केलेल्या नालेसफाईच्या टक्केवारीबाबत भाजप आणि काँग्रेसने शंका उपस्थित केली.

 

मुंबईतील अनेक नाल्यांमध्ये गाळ पडून आहे, नाल्यातून उपसलेला गाळ काठावरून हलविण्यात आलेला नाही. असे असताना पूर्व उपनगरात 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतरच प्रशासनाचा दावा कितपत खरा ठरतो हे स्पष्ट होऊ शकेल. मात्र नालेसफाईच्या दाव्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version