मनसेच्या खळ्ळ खट्ट्याकनंतर मुंबई महापालिका झाली जागृत

मनसेच्या खळ्ळ खट्ट्याकनंतर मुंबई महापालिका झाली जागृत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेनं ठाण्यात फेरिवाल्यांविरेधात केलेल्या खळ्ळ खट्ट्याकनंतर मुंबई महापालिका जागृत झालेली दिसतेय. दादर, माहीम आणि माटुंगा रेल्वे स्थानकाच्या आसपास असणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेनं विशेष पथक नेमण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे रेल्वे स्टेशन बाहेर परिसर मोकळा होण्याची शक्यता आहे.

याबाबत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत मनसेच्या पुढाकारानं दादरच्या जी उत्तर विभागात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्याची घोषणा पालिका उपायुक्त उमाकांत बिरादर यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version