Kurla Ghatkopar Flyover: वाहतूक कोंडीला ‘गुडबाय’: कुर्ल्याहून घाटकोपरकडे जाण्यासाठी 4.5 किमी लांबीच्या उड्डाणपूलाला मंजुरी

LBS मार्गावरील सततच्या कोंडीवर उपाय म्हणून BMC ने 4.2 किमी उड्डाणपूलासाठी 1635 कोटींची निविदा जाहीर केली आहे. प्रकल्प मेट्रो व MRIDC पुलाशी जोडला जाणार आहे.
Kurla Ghatkopar Flyover: वाहतूक कोंडीला ‘गुडबाय’: कुर्ल्याहून घाटकोपरकडे जाण्यासाठी 4.5 किमी लांबीच्या उड्डाणपूलाला मंजुरी

मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation – BMC) यांनी लालबहादूर शास्त्री मार्ग (Lal Bahadur Shastri Marg – LBS Marg) वरील सततच्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कुर्ला पश्चिमेतील कल्पना टॉकीजपासून घाटकोपर पश्चिमेतील शाह बाबा दर्गा या दरम्यान 4.2 किलोमीटर लांबीचाउड्डाणपूल उभारण्यासाठी BMC ने निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे एक हजार 635 कोटी असून काम पूर्ण होण्यास सुमारे 3 वर्षे लागतील. लाल बहादूर शास्त्री रोड हा पूर्व उपनगरांना मध्य मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून अंधेरी–घाटकोपर लिंक रोड (Andheri – Ghatkopar Link Road, AGLR), घाटकोपर स्टेशन रोड आणि संत नरसी मेहता रोड या तिन्ही जंक्शनवर सातत्याने कोंडी होते. या मार्गावर मिळणारे लहान क्रॉस-रोड्सही वाहतूक अडथळा वाढवतात. त्यामुळे BMC ने दोन-मार्गी, चार-लेन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरील वरील सरवोदया हॉस्पिटलजवळील जंक्शन, तसेच संत नरसी मेहता रोडसमोरील BMC यार्डजवळील चौकात वाहनांचा ताण अत्यंत वाढतो. हा उड्डाणपूल झाल्यास संपूर्ण कॉरिडॉरवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. या प्रकल्पाचे डिझाइन अधिक गुंतागुंतीचे असणार आहे. उड्डाणपूल महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation – MRIDC) च्या घाटकोपर पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या पुलाशी आणि सरवोदया हॉस्पिटलजवळील मेट्रो लाईनशी एकत्रित करावे लागणार आहे. उड्डाणपूल हा मेट्रो मार्गाच्या वरून जाणार असल्याने त्याचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल.

हेही वाचा: Rohini Acharya : 'तुम्हाला चपलेनं मारलं जाईल…, त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं'; रोहिणी आचार्य यांचे कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे

या प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर असून प्री-बिड मीटिंग 21 नोव्हेंबर रोजी BMC मुख्यालयात होणार आहे. कुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल गालगली यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले. ते म्हणाले की, उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनचालकांना विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल (Vikhroli Railway Over Bridge, ROB) मार्गे Eastern Express Highway वर जलद प्रवेश मिळेल.

याशिवाय पोवई, JVLR (Jogeshwari – Vikhroli Link Road) आणि पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनचालकांनाही मोठा फायदा होईल. या उड्डाणपुलामुळे लाल बहादूर शास्त्री रोडवरील दररोजची कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित व सोयीस्कर प्रवास अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: Maharashtra Crime News: छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आली धक्कादायक बाब

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version