Crime News : महाराष्ट्र ते झारखंड व्हाया बांगलादेश; निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश

बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बनावट चलनाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे.
Crime News : महाराष्ट्र ते झारखंड व्हाया बांगलादेश; निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई: बीएमसी (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क मोडमध्ये असून, त्याच अनुषंगाने बनावट चलनाच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यात, बांग्लादेश सीमेलगत गुप्त ऑपरेशन राबवत या प्रकरणातील एका महिला आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या संभाव्य वापराला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.

ही कारवाई गेल्या आठवड्यात दादर रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आलेल्या प्रकरणाशी संबंधित आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाजवळून अमरुद्दीन शेख (वय 61) याला अटक केली होती. त्याच्याकडून 500 रुपयांच्या बनावट नोटा, एकूण 72,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तपासात या बनावट नोटा अत्यंत उच्च दर्जाच्या असल्याचे समोर आले असून, त्या बांग्लादेशातून भारतात आणल्या गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview: "ज्यांना मुंबई वेगळी करायची आहे, ते महानगरपालिकेत आले तर मराठी माणूस…" राज ठाकरेंनी 'तो' मुद्दा आडपडदा न ठेवता मांडला

पोलिस चौकशीत अमरुद्दीन शेख याने यापूर्वीही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा बाजारात चलनात आणल्याचे उघड झाले आहे. या नोटांचा वापर कोणत्या भागात आणि कोणत्या माध्यमातून करण्यात आला, याचा सखोल तपास सुरू आहे. या तपासादरम्यान या रॅकेटमधील फरार महिला आरोपी जोसना बीबी उर्फ जोसना सेराजुल शेख (वय 49) हिचा शोध लागला.

राधानगर पोलिसांच्या मदतीने झारखंडमधून जोसनाला अटक करण्यात आली. तपासात ती बनावट नोटांची मुख्य पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती 60,000 रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मागील दोन वर्षांपासून ती या बेकायदेशीर नेटवर्कमध्ये सक्रिय होती.

प्राथमिक अंदाजानुसार, जोसना हिने आतापर्यंत सुमारे 12 ते 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, या रॅकेटमधील इतर आरोपी, संपर्क साखळी आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: Raj -Udhhav Thackeray Interview: 'दररोज 56 गाड्या उत्तरेतून महाराष्ट्रात भरून येतात आणि रिकाम्या जातात…ते आपापले मतदारसंघ बनवतायंत'; राज ठाकरेंनी सांगितला परप्रांतियांचा 'प्लॅन'

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version