BMC Corporators: महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस; 237 नगरसेवकांना महिनाभरात मिळणार Apple टॅब

नगरसेवकांना बैठकीपूर्वी आवश्यक कागदपत्रे डिजिटल माध्यमातून पाहता येणार आहेत.
BMC Corporators: महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस; 237 नगरसेवकांना महिनाभरात मिळणार Apple टॅब

महापालिकेचा कारभार अधिक पेपरलेस, डिजिटल आणि हायटेक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेतील 237 नगरसेवकांना महिनाभरात टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये 227 निवडून आलेले नगरसेवक आणि 10 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या सभागृहाच्या तसेच विविध समित्यांच्या बैठकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या विषयपत्रिका यापुढे हार्ड कॉपीच्या स्वरूपात न देता थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांना बैठकीपूर्वी आवश्यक कागदपत्रे डिजिटल माध्यमातून पाहता येणार आहेत.

प्रशासनाकडून नगरसेवकांसाठी ॲपल कंपनीचे टॅब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या टॅबवर नगरसेवकांना सभागृहातील प्रस्ताव, विविध अहवाल, विषयपत्रिका तसेच अन्य आवश्यक माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या सभेच्या विषयपत्रिका आणि संबंधित कागदपत्रांच्या हार्ड कॉपी तयार करून त्या नगरसेवकांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो. डिजिटल पद्धतीचा अवलंब केल्यानंतर कागदाचा वापर, छपाईचा खर्च आणि विषयपत्रिका घरोघरी पोहोचवण्याचा कर्मचाऱ्यांवरील व्याप कमी होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा – TMC Property Tax Hike: ठाणे पालिका प्रशासनाचा कठोर निर्णय; तब्बल 10 वर्षांनंतर मालमत्ता कर अन् TMT बसभाड्यात होणार वाढ? 

नगरसेवकांना आवश्यक कागदपत्रे टॅबवर एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने महापालिकेच्या कामकाजातही अधिक सुलभता आणि वेग येण्याची शक्यता आहे. बैठकीदरम्यान प्रस्ताव आणि अहवालही थेट टॅबवर पाहता येणार आहेत.

महापालिकेच्या आयटी विभागाकडून टॅब खरेदीची प्रक्रिया सुरू असून, येत्या महिनाभरात २३७ नगरसेवकांना टॅब उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेचे सभागृह आणि विविध समित्यांचे कामकाज अधिकाधिक डिजिटल आणि पेपरलेस होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version