जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आहे.
सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी आपल्या घरासमोरील सार्वजनिक टॉयलेट हटवण्यात यावे याकरता महापौरांना पत्र लिहिलं होते.
घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असं कारण सलीम खान यांनी महापौरांना दिलं होते.
मात्र, प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे हागणदारीमुक्त स्वच्छ मुंबई या योजनेचा ब्रँड एँबेसेडर असलेल्या सलमान खानच्या कुटुंबाकडूनच
अशा प्रकारे शौचालयाला विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.