संशयाचे भूत ‘त्याच्या’ डोक्यात शिरलं अन् तो नको ते करुन बसला

संशयाचे भूत ‘त्याच्या’ डोक्यात शिरलं अन् तो नको ते करुन बसला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून आरोपी फरार झाला आहे. नागपूरच्या कळमना भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

 

एकनाथ कोहळे असं आरोपीचं नाव असून शनिवारी रात्री पत्नीच्या डोक्यात दांडका घालून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

एकनाथवर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असून, एक महिन्यापुर्वीच जेलमधून शिक्षा भोगून आला होता. एकनाथ आणि त्याच्या पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून

अनेकदा भांडण होत असत.

 

परंतु शनिवारी रात्री हे भांडण विकोपाला गेले आणि एकनाथने त्याची पत्नी ममता हिच्या डोक्यात लाकडी दंडूक्यानं वार केला. दुसऱ्या दिवशी ममताला हॉस्पीटलमध्ये

भरती करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान तीचा दुर्दैवी मृत्यु झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version