मुंबई : रेशनच्या दोन लाख रुपयांच्या धान्याचा काळा बाजार झाल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत दुकान कर्मचारी आणि अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे. शिधावाटप कार्यालय क्रमांक '३२ ई' कुर्लाचे शिधा वाटप निरीक्षक महादेव पवार यांनी शुक्रवारी याप्रकरणी तक्रार केली आहे. त्यानुसार साकीनाका सेंट्रल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह होलसेल अॅण्ड रिटेल स्टोअरचा लिपिक शंकर नाडर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.