राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान शुक्रवारी पार पडले. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला आहे. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते. यानंतर भाजपने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.
या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईच्या भाजप कार्यालयात जोरादार स्वागत केलं. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ढोलताशाच्या गजरात फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. फडणवीस म्हणाले ज्यांनी इतिहास रचला आणि संजय राऊतांपेक्षा जास्त मताने निवडून आले ते धनंजय महाडीक आहेत. हा विजय विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळकांना समर्पित करतो, त्यांच्या मतदानामुळे तिसरी जागा निवडून आली असं फडणवीस म्हणाले. तसेच विजयामुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय असा टोला फडणवीसांनी लगावला. तसेच आपण जिंकलोय उन्माद करायचा नसतो असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
कशा प्रकारे भाजपाने साजरा केला विजय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.