‘भाजपाची भूमिका ही भारताची भूमिका नाही’

‘भाजपाची भूमिका ही भारताची भूमिका नाही’

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपच्या नूपुर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यात मोठा वाद निर्माण झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत भाष्य करताना विरोधकांवर निशाणा साधला. भाजपा प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

पैगंबर यांच्याबाबत नूपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. तर याप्रकरणी अरब आणि इस्लामिक या देशांमध्ये भारताविरोधात आक्रोश निर्माण झाला. त्यामुळे याप्रकरणाचा उद्धव ठाकरे यांनी सभेत खरपूस समाचार घेतला. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भारताची भूमिका ही देशाची भूमिका नसल्याचे वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा द्वेष करण्यास शिकवलेलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. तसेच आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्राषितांचा अपमान करण्याची काहीही गरज नसल्याचे ठाकरे म्हणाले. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला आहे. त्यामुळे त्यासाठी देशावर नामुष्की का? असा सवाल उपस्थित करत भाजपाची भूमिका ही भारताची भूमिका नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version