भाजपचा जालन्यात जल आक्रोश मोर्चा

भाजपचा जालन्यात जल आक्रोश मोर्चा

जालना शहरालातील पाणी प्रश्न, रखडलेल्या विकास कामासह इतर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील मामा चौकातून हा मोर्चा निघून नागरपालिकेवर धडकणार आहे. या मोर्चाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी प्रश्नावरून सर्वसामन्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला आहे.

देवेंद्र फडणवीस समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी परिधान केलेल्या टी शर्टवर माजी मुख्यमंत्री तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे छायाचित्र आहे. या टी शर्टवर मोठ्या अक्षरात “जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे” असं लिहिलेलं आहे. ज्यामुळे जल आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असा अप्रत्यक्ष संदेश तर देत नाहीये ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

अनियमित पाणीपुरवठा, कृत्रिम पाणीटंचाई आणि अशुध्द पाण्यासोबत शहरातील इतर ही अनेक पायाभूत प्रश्नांसंदर्भात या मोर्चाच्या मध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. भाजपच्या वतीने शहरभर मोठं मोठाले बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version