भाजपाचे ‘घर चलो’ अभियान’

भाजपाचे ‘घर चलो’ अभियान’

केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून अनेक योजना राबविल्या आहेत. मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या १७६ योजना महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालवधीत ‘घर चलो’ हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीत २२० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’’ असेही ते म्हणाले. भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक गुरुवारी (दि. ८ मे) पुण्यात झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

काय म्हणाले बावनकुळे?
‘‘आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा विचार आम्ही करीत आहोत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविजयाचा संकल्प केला आहे. राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गेल्या १० महिन्यांत चांगले काम केले त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. २०२४ चा विजयसंकल्प मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडू असा आम्हाला विश्वास आहे. या अभियानात ३५ लाख कार्यकर्ते सहभागी होणार असून, साठ हजार घरांपर्यंत पोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भाजपा कधीही कागदावर काम करत नाही.’’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version