‘मुंबईकरांचा आक्रोश भाजपा मांडणार’

‘मुंबईकरांचा आक्रोश भाजपा मांडणार’

मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: मुंबई भाजपकडून उबाठा गटाला प्रश्न विचारण्याकरता ‘मुंबई आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले असून भाजप युवा मोर्चा आणि भाजप महिला आघाडी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे काढण्यात येणार आहे. भाजपच्या मुंबई येथील नरिमन पॉईंट कार्यालयापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत मोर्चा जाणार आहे. तर भाजप महिला आघाडीचा मोर्चा दादर स्टेशन ते पोलीस आयुक्तालयाकडे जाईल, उध्दव ठाकरेंच्या सरकारात बीएमसीत झालेल्या घोटाळ्यांची एसआयटी चौकशी आणि अटक यासंदर्भात पोलीस आयुक्तालयात जाब विचारला जाईल, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, उबाठा गटाने काढलेला मोर्चा हा ‘चोर मचाये शोर’ असल्याचेही आशिष शेलार म्हणाले. उबाठा गटाने कोविड काळात केलेला भ्रष्टाचार याची उत्तरे मुंबईकर मागत असून हा मोर्चा म्हणजे मुंबईकरांचा आक्रोश असल्याचे ते म्हणाले. हा मोर्चा भाजप महायुतीचा असून रिपाई, शिवसेना(शिंदे गट) यांचादेखील सहभाग असणार आहे. तसेच, मुंबईतील भ्रष्ट आणि घोटाळेबाज कंत्राट उध्दव ठाकरेंच्या काळातले असून फडणवीस-शिंदे सरकारने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत मुंबईत उत्तम रस्ते बांधत आहे, असेही ते म्हणाले. आमचे सरकार हे जनतेचे सरकार आहे, त्यामुळे विरोधकांच्या मताला फारसे तथ्य नसल्याचे ते म्हणाले. भाजप जनतेचे प्रश्न मांडत असून ठाकरे गटाचे प्रश्न ठाकरे गटालाच विचारा असे शेलार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version