भाजपाच्या पदाधिकारी सना खानची हत्या, एकाला अटक

भाजपाच्या पदाधिकारी सना खानची हत्या, एकाला अटक

भारतीय जनता पार्टीच्या नागपूर शहरातील पदाधिकारी सना खान यांची हत्या करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून सना खान बेपत्ता होत्या. पोलीस त्यांचा शोध घेत होते.

सना खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमित शाहू यांचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. जीतेंद्र गौडने सना यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याची तसेच अमित शाहू यांची कार स्वच्छ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

सना खान जबलपूर येथील अमित शाहू उर्फ पप्पू साहू यांना भेटण्यासाठी १ ऑगस्ट रोजी गेल्या होत्या. यानंतर सना खान यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. अखेर सना यांच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अमित शाहू यांच्याकडे चौकशीसाठी गेले. पोलीस येण्याआधीच अमित शाहू आणि त्यांचा नोकर जीतेंद्र गौड फरार झाले होते. अमित शाहू यांचा ढाबा बंद होता. यानंतर पोलिसांनी अमित शाहूं आणि त्यांच्या नोकराचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी अमित शाहू यांचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. जीतेंद्रची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान जीतेंद्रने सना यांची हत्या केल्याची कबुली दिली.

अमित शाहू यांच्या कारच्या डिकीत रक्त आढळले

पोलिसांना तपास करताना अमित शाहू यांच्या कारच्या डिकीत रक्त सांडलेले आढळले. या रक्ताचे नमुने पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. सना यांच्या हत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version