जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूर महानगरपालिकेत भाजपला तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करता आली. भाजपचे तब्बल 112 नगरसेवक निवडून आले. नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याची नागपूरची 30 वर्षांची परंपरा यावेळीही भाजपाने पाळली.
नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांचे एकत्रित राजीनामे घेतले जातात. त्यानंतर हे राजीनामे सत्तापक्ष नेत्याकडे सुरक्षित ठेवले जातात.
यामुळे पार्टीविरोधी कार्य केल्यास, त्या नगरसेवकावर कारवाई करणं सोपं जात असल्याचं भाजप नेते सांगतात. यावेळी नगरसेवकांचे एकत्रित राजीनामे घेण्यास उशीर झाला. त्यामुळे नगरसेवकांचे अशाप्रकारे राजीनामे घेतले जात असल्यानं राजकीय क्षेत्रात सध्या खळबळ उडालीय. भाजप नेते गिरीश व्य़ास यांनी नगरसेवकांच्या राजीनाम्यांबाबत स्पष्टीकरण दिलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.