भाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा आगाऊपणा; शेतकरी संप मिटल्याची झळकावली पोस्टर्स

भाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा आगाऊपणा; शेतकरी संप मिटल्याची झळकावली पोस्टर्स

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा आगाऊपण समोर आला. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याची घोषणा केल्यानंतरही राज्यात ठिक-ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरु आहे.

 

अशातच मुंबईच्या वाळकेश्वर भागात भाजप कार्यकर्त्यांकडून ‘पोशिंदा महाराष्ट्राचा सुखावला’ असल्याचं पोश्टर झळकावले आहेत.

 

या पोस्टरमध्ये ‘मार्ग काढला संप मिटला’ असं छापण्यात आले. वाळकेश्वरच्या अनेक भागात असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

 

भाजप कार्यकर्त्यांचा असाच आगाऊपणा सोमवारी जालन्यात पाहायला मिळाला. राज्यात शेतकरी संप सुरु असताना केंद्र सरकारनं कर्जमाफी दिल्याचं पोस्टर झळकावत

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

 

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावून राज्य सरकारचं अभिनंदन केलं होते. राज्यातील भाजप

कार्यकर्त्यांच्या या दोन्ही प्रकारामुळे या भाजप कार्यकर्त्यांचा उद्दामपणा समोर आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version