नागपूर बनलयं क्राईम कॅपिटल; भाजप आमदारानेच लिहिले मुख्यमंत्र्यांना सात पानांचे पत्र

नागपूर बनलयं क्राईम कॅपिटल; भाजप आमदारानेच लिहिले मुख्यमंत्र्यांना सात पानांचे पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत.

सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलंय.

ज्यामध्ये स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलंय. फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही.

शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा – सुव्यवस्था अधिक बिघडलीये. नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version