उपोषणाची संपली हाव, खाद्यपदार्थांवर मारला ताव

उपोषणाची संपली हाव, खाद्यपदार्थांवर मारला ताव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाजपचे दोन आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांचा उपवास सुटलाय. हे दोघे बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू असलेल्या उपोषणामधे काही वेळ सहभागी झाले. त्यानंतर हे दोघे काउन्सील होलला पोहचले. तीथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेची बैठक होती.

या बैठकीला ग्रामीण मतदारसंघ असलेल्या आमदारांना हजर रहायचं होतं. बैठक सुरू झाली आणि प्रथेप्रमाणे समोर प्लेट्स आल्या. सॅंडवीच, वेफर्स आणि बर्फी. दोन्ही आमदार महोदयांनी त्याचा आस्वाद घेतला. दोघे शेजारी बसले आहेत आणि व्हीडीओमधे खाताना दिसत आहेत. हा व्हीडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतं आहे. कॉग्रेसप्रमाणे भाजपाच्या उपोषणाच्या पुण्यात फज्जा झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version